गोद्री कुंभ मेळाव्यात देण्यात आलेल्या आश्वासनांची सरकारने केली पुर्ती
संत सेवालाल महाराज बंजारा/लबाणा तांडा समृद्धी योजनेसाठी ५०० कोटींची भरीव तरतूद.
मुंबई दि.०५ – राज्यामध्ये मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा/ लबाणा समाजाची लोकसंख्या जवळपास २५ लाखांच्या आसपास आहे. मात्र आजही हा समाज व त्यांचे तांडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. त्यांच्या विकासासाठी, तसेच राहणीमान उंचावण्यासाठी, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी शासन स्तरावरून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यांचा एक भाग म्हणून आज समाजाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण संत सेवालाल महाराज बंजारा/लबाणा तांडा समृद्धी योजना राबविण्यात येणार असून या माध्यमातून समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
गोद्री कुंभ मेळ्यात देण्यात आलेल्या आश्वासनांची सरकारने आज केली पूर्तता केली असून याबाबतीत आज पार पडलेल्या मंत्री मंडळ बैठकीत सुधारित तांडा समृद्धी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी गोद्री येथे देशभरातील बंजारा/लबाणा समाजांचा मोठा कुंभ मेळा घेण्यात आला होता. यामध्ये समाजाच्या वतीने आपल्या मागण्या संदर्भातील माहिती गोद्री कुंभ मेळाव्याचे मुख्य संयोजक श्री रामेश्वर नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आली होती.
याबाबत सततचा पाठपुरावा करून अनेक बैठकांचे आयोजन करून आपल्या समाजाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यात आज यश मिळाल्याची माहिती श्री रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.