Skip to content
खेळामुळे एकता, सहकार्यासह निरोगी समाज घडतो- शंकर बरनेला विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये नामवंत खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न दिग्रस – आज बहुतेक लोक आधुनिकतेच्या चक्रात व्यस्त आहेत.आधुनिक संसाधने आणि सोशल मीडियाने तरुणांना मैदानी खेळांपासून दूर नेले आहे.समाजात खेळाची भूमिका केवळ व्यक्तीसाठीच नाही,तर सार्वजनिक आरोग्यासाठीही महत्त्वाची बनली आहे. खेळामुळे व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनते, शिस्त आणि सहभागाची भावना वाढते, उत्साही बनते.शारीरिक हालचाली आणि व्यायामामुळे रोग टाळण्यास किंवा ते कमी करण्यात महत्त्वाचा सकारात्मक परिणाम होतो. खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यात मदत होते, नैराश्य आणि चिंता कमी होऊन एकाग्रता सुधारते.मेंदू तल्लख ठेवण्यासाठी खेळामध्ये सक्रिय राहणे आवश्यक आहे.खेळांमध्ये भाग घेऊन, आपण चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहू शकतो,खेळात आपल्या वेळेचा चांगला वापर करून बाहेरच्या वाईट सवयी टाळू शकतो.खेळातील सहभागामुळे विचारशक्ती आणि विश्लेषण कौशल्य सुधारते आणि चांगले निर्णय घेण्यास मदत होते तसेच खेळ आत्मविश्वास वाढवून, संतुलित वजन राखून निरोगी जीवनशैली जगण्याची शक्यता वाढवून सामाजिक कौशल्ये सुधारतात.खेळामुळे एकता सहकार्याची भावना विकसित होते, निरोगी व्यक्ती किंवा खेळाडू हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज निरोगी देश बनवतो असे मत शंकर बारणेला यांनी विद्यानिकेतन शाळेच्या क्रीडा सप्ताहाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात व्यक्त केले.या क्रीडा सप्ताहाचा अतिशय भव्य बक्षिस वितरण सोहळा आयोजित केला होता विशेष बाब म्हणजे यामध्ये दिग्रस शहरातील विविध क्रीडा प्रकारातील अनेक नामांकित व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये शंकर बरणेला, प्यारेलाल पवार, सुरेश शर्मा, वसंत एडके शिवाजी पाटील सुरेंद्र राठोड श्रीचंद राठोड संजय निरपासे हे होते.सर्वप्रथम या खेळाडूंचे शाळेच्या बँड पथक व लेझिमच्या सुमधुर तालासह आगमन झाले या नंतर स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी या दिग्गज खेळाडूंना मानवंदना दिली.खेळासंबंधी विविध क्रीडा नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यानंतर उपस्थित क्रीडापटूंचे शाळेचे अध्यक्ष डॉ.संजय बंग,सचिव डॉ.रश्मी बंग सदस्य नील बंग यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल श्रीफळ तसेच विजयचिन्ह देण्यात आले. तसेच तसेच जुडो या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्तरावर विजयी झालेल्या श्रावणी डिके समृद्धी क व गार्गी थोरवे यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व विजयचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल द्वारा आयोजित “व्ही.आय.एस.ओलंपिक” नामक क्रीडा सप्ताहातील विविध खेळात विजयी खेळाडूंचा शाळेच्या प्रतिनिधी मंडळाद्वारे सत्कार सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसह शेकडो पालक उपस्थित होते. या क्रीडा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती विलास राऊत नितीन राऊत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
खेळामुळे एकता, सहकार्यासह निरोगी समाज घडतो- शंकर बरनेला विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये नामवंत खेळाडूंचा सत्कार सोहळा दिग्रस – संपन्न आज बहुतेक लोक आधुनिकतेच्या चक्रात व्यस्त आहेत.आधुनिक संसाधने आणि सोशल मीडियाने तरुणांना मैदानी खेळांपासून दूर नेले आहे.समाजात खेळाची भूमिका केवळ व्यक्तीसाठीच नाही,तर सार्वजनिक आरोग्यासाठीही महत्त्वाची बनली आहे. खेळामुळे व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनते, शिस्त आणि सहभागाची भावना वाढते, उत्साही बनते.शारीरिक हालचाली आणि व्यायामामुळे रोग टाळण्यास किंवा ते कमी करण्यात महत्त्वाचा सकारात्मक परिणाम होतो. खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यात मदत होते, नैराश्य आणि चिंता कमी होऊन एकाग्रता सुधारते.मेंदू तल्लख ठेवण्यासाठी खेळामध्ये सक्रिय राहणे आवश्यक आहे.खेळांमध्ये भाग घेऊन, आपण चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहू शकतो,खेळात आपल्या वेळेचा चांगला वापर करून बाहेरच्या वाईट सवयी टाळू शकतो.खेळातील सहभागामुळे विचारशक्ती आणि विश्लेषण कौशल्य सुधारते आणि चांगले निर्णय घेण्यास मदत होते तसेच खेळ आत्मविश्वास वाढवून, संतुलित वजन राखून निरोगी जीवनशैली जगण्याची शक्यता वाढवून सामाजिक कौशल्ये सुधारतात.खेळामुळे एकता सहकार्याची भावना विकसित होते, निरोगी व्यक्ती किंवा खेळाडू हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज निरोगी देश बनवतो असे मत शंकर बारणेला यांनी विद्यानिकेतन शाळेच्या क्रीडा सप्ताहाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात व्यक्त केले.या क्रीडा सप्ताहाचा अतिशय भव्य बक्षिस वितरण सोहळा आयोजित केला होता विशेष बाब म्हणजे यामध्ये दिग्रस शहरातील विविध क्रीडा प्रकारातील अनेक नामांकित व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये शंकर बरणेला, प्यारेलाल पवार, सुरेश शर्मा, वसंत एडके शिवाजी पाटील सुरेंद्र राठोड श्रीचंद राठोड संजय निरपासे हे होते.सर्वप्रथम या खेळाडूंचे शाळेच्या बँड पथक व लेझिमच्या सुमधुर तालासह आगमन झाले या नंतर स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी या दिग्गज खेळाडूंना मानवंदना दिली.खेळासंबंधी विविध क्रीडा नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यानंतर उपस्थित क्रीडापटूंचे शाळेचे अध्यक्ष डॉ.संजय बंग,सचिव डॉ.रश्मी बंग सदस्य नील बंग यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल श्रीफळ तसेच विजयचिन्ह देण्यात आले. तसेच तसेच जुडो या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्तरावर विजयी झालेल्या श्रावणी डिके समृद्धी क व गार्गी थोरवे यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व विजयचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल द्वारा आयोजित “व्ही.आय.एस.ओलंपिक” नामक क्रीडा सप्ताहातील विविध खेळात विजयी खेळाडूंचा शाळेच्या प्रतिनिधी मंडळाद्वारे सत्कार सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसह शेकडो पालक उपस्थित होते. या क्रीडा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती विलास राऊत नितीन राऊत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!