बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबध्द.मंत्री गिरीश महाजन
बंजारा समाजांच्या साठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार
गोद्री कुंभ मेळ्याच्या वर्षे पुर्ती निमित्ताने आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई
राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला बंजारा समाज भटक्या विमुक्त जमाती मध्ये असून समाजाला विकासाच्या दृष्टीने अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
या वेळी प्रधान सचिव एकनाथ डवले माजी खासदार हरिभाऊ राठोड,आ, राजेश राठोड, आ मंगेश चव्हाण बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष,शंकर पवार,गोद्री कुंभ प्रमुख, राज्य धर्मादाय समिती प्रमुख रामेश्वर नाईक, अरूण चव्हाण गोरसेना अध्यक्ष,संत गोपाल चैतन्य बाबाजी पाल, धर्मगुरू कबीर दास महाराज श्याम चैतन्य महाराज, सुंदर महाजन , दिनेश चव्हाण उपसचिव इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, श्रीकृष्ण पवार उपसचिव, श्री जयराम पवार उपजिल्हाधिकारी पंडित जाधव उपसचिव ग्रामविकास आदी सह संबंधित विभागाचे अधिकारी व जयश्री राठोड वैशाली जाधव उपस्थित होते.
यावेळी गोद्री येथील कुंभ मेळ्यास वर्षे पुर्ती झाल्याच्या निमित्ताने आज समाजातील वेगवेगळ्या समस्या बाबतीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
समाजातील वेगवेगळ्या भागातील तांड्याला जोडण्यासाठी वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेला गती देण्याबरोबरच तांड्याला महसुली गाव म्हणून मान्यता देण्याबाबत चर्च करण्यात आली.
बंजारा -लबाना समाजातील मोठ्या प्रमाणावर होणारे धर्मांतर रोखण्यासाठी मध्यप्रदेश, आणि उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच समाजातील कला परंपरा, संस्कृती आदी बाबींचे जतन करण्यासाठी विशेष भर देण्यात यावा अशा सुचनाही यावेळी श्री महाजन यांनी दिल्या.
समाजाच्या उन्नतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या वसंतराव नाईक महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी श्री गिरीश महाजन यांनी दिली.