पसरणी येथे बँडबाजा वाजवत निघाली प्रभातफेरी.
कारंजा – जि.प.शाळा शाळा पसरणी येथिल विद्यार्थ्याची प्रभात फेरी बॅन्ड बाजा वाजवून वाजत गाजत काढण्यात आली.प्रजासत्ताक दिनानिमित्य गावात उत्साहाच्या वातावरणात आगळ्यावेगळ्या पद्धतीने काढलेल्या प्रभातफेरीचे गावकार्यांनी कौतुक केले.उपस्थित सर्व कर्मचार्यांनी फेटा बांधून शोभा वाढवली.प्रभातफेरी नंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच श्री चाँद गारवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जि.प.शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मेहबुब चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजपूजन शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली राठोड(चव्हाण) यांनी केले.ध्वजारोहणानंतर शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.सांस्कृतीक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना गावकर्यांनी प्रोत्साहनपर बक्षिस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मेहबुब चौधरी,शाळा व्यवस्थान समिती उपाध्यक्ष सौ सोनाली दिपक नेमाने,सरपंच श्री चाँद गारवे,उपसरपंच श्री बाळू बरडे,तंटामुक्ती अध्यक्ष श्री रमजान नौरंगाबादी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक तसेच गावातील उत्साही नागरिक उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली राठोड(चव्हाण),विलास कडू,हेमा भिंगारे,सोनल काकड यांनी कार्यक्रम उत्साहात पार पाडला.