खेळामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक विकासासह आत्मविश्वासात वाढ होते-डॉ संजय बंग
विद्यानिकेतन शाळेत क्रीडा सप्ताह व क्रीडा प्रदर्शनीचा उद्घाटन सोहळा संपन्न
दिग्रस – खेळाद्वारे एकता, आत्मविश्वास ,उत्साह, धैर्य आणि विनम्रता ह्या महत्वपूर्णमानवी गुणांची स्थापना करते. खेळाच्या प्रतिस्पर्धात्मक माहितीचा विकास होणे,संघर्ष करण्याची क्षमता विकसित करणे हे सर्व नैतिक मूल्यांच्या विकासास सहाय्यता करते.शालेय जीवनात खेळाचे महत्व खूप मोठे आहे.शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी, सामरिक क्षमतेच्या विकासासाठी,समुदायी सहभागासाठी आणि नैतिकतेसाठी उपयुक्त आहे. आरोग्य,मानसिक विकास, सामरिक क्षमता, सहभाग आणि नैतिकता अशा बाबीत सक्षम करते असे मत विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष डॉ संजय बंग यांनी क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले.
सर्वप्रथम शाळेच्या सचिव डॉ.रश्मी बंग, सौ.राधादेवी बंग यांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत करून ‘व्ही.आय.एस.ऑलम्पिक’नामक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन केले गेले तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा गीत गायले या क्रीडा सप्ताहामध्ये हॉलीबॉल कबड्डी क्रिकेट चेस धावणे बॅडमिंटन टग ऑफ वॉर असे अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.खेळ हा केवळ मनोरंजन म्हणून खेळतात असे नाही तर खेळाचे परिपूर्ण स्वरूप कसे होते याचा इतिहास सुद्धा अतिशय रंजक व ज्ञानपूर्ण आहे म्हणूनच विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलने खेळाचा परिपूर्ण इतिहास,खेळाचे मानवी जीवनातील स्थान मांडण्याचा प्रयत्न केला आहे.शाळेच्या क्रीडा सप्ताहामध्येच खेळासंबंधी अतिशय आकर्षक व ज्ञानपूर्ण पैलू क्रीडा प्रदर्शनीत मांडली अशाप्रकारची क्रीडा प्रदर्शनी मांडणारी विद्यानिकेतन ही प्रथमच शाळा आहे या प्रदर्शनी मध्ये खेळासंबंधी माहिती विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक पि.पि.टी मध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली.यामध्ये प्राचीन काळातील क्रीडा स्वरूप,आधुनिक काळातील क्रीडा स्वरूप,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंची माहिती,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार,योग साधना,
ध्यान साधना,मुलांची सुरक्षा,
अशा अनेक क्रीडा विषयावर आधारित प्रदर्शनी स्वरूपात दालन उघडले.जेणेकरून क्रीडा संदर्भात विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध व्हावे व त्याद्वारे खेळाचे महत्त्व तसेच सर्वांसाठी खेळ म्हणजे आत्मविश्वास, उत्साही जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे सिद्ध होते. विशेष बाब म्हणजे ही क्रीडा प्रदर्शनी सकाळी 8.30 ते 11.30 पर्यंत विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह इतर शाळेच्या विद्यार्थी व पालकांसाठी सुद्धा खुली राहील. या क्रीडा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.