विद्यानिकेतन शाळा हेच माझे मंदिर म्हणून स्वच्छता अभियान संपन्न
विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचा अभिनव उपक्रम
दिग्रस –२२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामाचे अयोध्या येथील भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतभर ‘हर मंदिर स्वच्छता अभियान ‘ राबवण्यात यावे असे आवाहन देशवासीयांना केले आहे.याच अभियानाचा भाग म्हणून “माझी शाळा हेच माझे विद्यामंदिर”असल्यामुळे शाळा परिसर स्वच्छता अभियान हा अभिनव उपक्रम विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये अत्यंत आनंदात राबविण्यात आला.
या अभिनव उपक्रमात रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ ला सकाळी 9 वाजता वर्ग 4 ते 12 चे निवडक विद्यार्थी व शिक्षक सहभागी होऊन आपल्या सरस्वतीरुपी विद्यामंदिर व परिसराला स्वच्छ करून प्रभू श्रीरामांना शतशः नमन केले.या अभिनव उपक्रमाची संकल्पना विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष डॉ संजय बंग यांची होती.या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक व सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.