अमोल पाटणकर यांच्या हस्ते कार सेवकांचा भव्य सत्कार
कारसेवक स्व.अनिल देशमुख यांना आदरांजली
मानोरा:– प्रभू श्रीरामचंद्र प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तालुक्यातील ग्राम हिवरा बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ व विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, स्वामी रामदेव बाबा योगपीठ समिती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातर्फे कारासेवकांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.
अयोध्याला अत्यंत बिकट परिस्थिती असतांना सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जन्मस्थानासाठी आपले योगदान देण्यासाठी त्यावेळेस अनेक ग्रामस्थ गेले होते. अनेक दिवस उपाशी राहून त्यांनी त्यावेळेस कार सेवकाचे कार्य केले.अशा कारसेवकांचा सत्कार घेण्यात आला.
स्व.अनिल आप्पारावजी देशमुख यांना प्रारंभी आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कारसेवक अनिल देशमुख यांचे चिरंजीव शैलेश अनिल देशमुख व त्यांच्या मातोश्री कमलाबाई आप्पाराव देशमुख, त्यांची बहीण सुनीता अशोकराव देशमुख व त्यांचा भाऊ व गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख याचा सत्कार अमोलभाऊ पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. कारसेवक राजेश चंदनकार, सुरेश तुळजापुरे, दीपक श्रावणे यांच्या जागी त्यांचा पुतण्या पांडुरंग श्रावणे,रामेश्वर नवले यांच्या जागी त्यांचा मुलगा चिरंजीव नवले, संजय चंदनकर यांच्या जागी त्यांचे भाऊ बाळू चंदनकर अशा सर्व कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाला प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचे अपर सचिव अमोल पाटणकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक वीरेंद्र यादव, राम हेडा विश्व हिंदू परिषदेचे,डॉ. ललीत हेडा, अरवींद इंगोले,करन ठाकुर, आकाश शेळके, शंकर नागापुरे,आशीष चतुरकार, सुदाम तायडे, संजय यादव तसेच पं.स. सदस्य गोविंदराव म्हातारमारे, नामदेव नागापुरे, सतीश पाटील, श्याम तुळजापूर,बाबुराव भोयर, संतोष जाधव, रवी तुळजापुरे, रुपेश पाटील, संतोष गावंडे, संतोष चोरे, संतोष रोहनकार, गोपाल तुळजापुरे व गावातील प्रमुख नागरिक आणि युवकांची मोठ्या उत्साहाने प्रमुख उपस्थिती होती.