काशिनाथ नायक यांची जयंती चेतना दिन म्हणून साजरी
समस्त तालुका वाशियांकडून अभिवादन
मानोरा:–गोरसेना गोर सिकवाडी या चळवळीचे संस्थापक काशिनाथ नायक यांची जयंती आज मानोरा येथील पं.स.तील वसंतराव नाईक सभागृह येथे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम काशिनाथ नायक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील राठोड तालुकाध्यक्ष यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोतीराज जाधव विभागीय संयोजक गोरसिकवाडी, बलदेव चव्हाण तालुका सहसंयोजक दिग्रस, प्रकाश राठोड सरपंच देवठाणा, रणजीत वडतीया, उल्हास चव्हाण तालुका संंयोजक मानोरा, डिगाबंर चव्हाण,मनोहर राठोड,धनराज मेहल्डे,लखन मेघावत, गजानन चव्हाण, धनराज राठोड, गणेश जाधव,एस पी जाधव, विकलसिंग राठोड, अनिल जाधव, सुनिल राठोड भोयणी,आशिष राठोड, पंजाब चव्हाण उत्तम पवार,अजित राठोड, विठ्ठल राठोड,प्रेमकुमार चव्हाण, नितेश चव्हाण,यावेळी उपस्थित होते.
मोतीराज जाधव यांनी काशिनाथ नायक यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. काशिनाथ नायक म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी अतिशय संघर्षातून आपल्या समाजासाठी अहोरात्र काम केले म्हणून त्यांची जयंती ही चेतना दिन म्हणून सर्वत्र साजरी होत आहे असा उल्लेख त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्यावेळी बंजारा समाज हा विविध समस्येने ग्रासला होता अनेक अडचणी होत्या, कुणीही या समाजाला जागृत करण्यासाठी पुढे येत नव्हता अशा वेळेला त्यांनी आपली एसटी महामंडळातील मेकॅनिक पदाची नोकरी सांभाळून रात्रंदिवस समाज जागृतीचे कार्य केले असेही मोतीराज जाधव यांनी आपल्या मनोगत आतून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन गोपाल चव्हाण यांनी केले.तर आभार रणजीत वडतीया यांनी केले.