लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आरशाप्रमाणे असणे गरजेचे – माधवराव अंभोरे
मानोरा :- लोकशाहीच्या यशस्वीतेमध्ये मोलाचे हातभार असलेले माध्यम (वृत्तपत्र ई.) प्रतिनिधींनी निष्पक्ष तथा आपली वागणूक आरशाप्रमाणे ठेवून आपण काम करीत असलेल्या वृत्तपत्रांची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे आवाहन तालुक्यातील इंझोरी येथे आयोजित अ.भा. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित मानोरा तालुका पत्रकार संघटनेच्या बैठकीमध्ये जिल्हा अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी उपस्थित विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी समोर केले.
इंझोरी येथील पत्रकार नरेश असावा हया अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्यांच्या निवासस्थानी मानोरा तालुक्यातील संघटनेशी जुळलेल्या पत्रकारांची पत्रकारांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे हे होते तर प्रमुख उपस्थितीत संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा अमरावती विभागाचे माजी सचिव जगदीश राठोड,जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ राऊत, तालुका अध्यक्ष प्रविण ठाकरे,जि.प.सदस्य तथा बँक संचालक उमेश पाटिल ठाकरे,राजेश दबडे,नाना देवळे,ठाकुर,दादाराव गायकवाड आदिंची व्यासपिठावर उपस्थीती होती.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पत्रकार नरेशी असावा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जगदीश राठोड,प्रविण ठाकरे,जि.प.सदस्य उमेश पाटिल ठाकरे यांनी विचार मांडलेत.अध्यक्षीय भाषणातून माधवराव अंभोरे म्हणाले की, देशात लोकशाही असून लोकशाहीमध्ये सगळ्यांनी एकाच पक्षात अथवा संघटनेत राहणे शक्य नसल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अंभोरे यांनी काढले. मात्र कुठल्याही पक्षात अथवा संघटनेत कार्यरत असताना त्या संघटनेच्या ध्येयधोरणानुरूप प्रत्येकाने कार्य करण्याचे आग्रह अंभोरे यांनी केले.
राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात जुनी, सर्वाधिक सदस्य संख्या असणारी तथा सदस्यांच्या अडीअडचणींची जाणीव ठेवणारी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटना असल्याचे प्रतिपादन वाशिम जिल्हा अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी काढले. पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून या चांगल्या बाबींना प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करतो .ग्रामस्थ,राजकीय पुढारी यांच्या सोबतच्या पत्रकारांचे संवाद बैठकीतून विविध पैलू,बाबींवर चर्चा होऊन समाजाला न्याय देण्याचे कार्यसुद्धा होते.त्यामुळे अश्या बैठकांचे आयोजन नियमीत होणे आवश्यक असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक आयोजक नरेश असावा यांनी केले सूत्रसंचालन व आभार हरीश खडकीकर यांनी मानलेत. यावेळी आनंदा खुळे, सुदाम तायडे, देविदास पारस्कर,मनोहर राठोड, पंडित राठोड, इंद्रगोल राठोड, संजय गावंडे, संतोष इंगोले, बळवंत भगत, प्रमोद आडे, अफसर शहा मनोज आडे,राजकीय पुढारी व ग्रामस्थ अजय जयस्वाल,धनराज दिघडे ,गजानन ढाकूलकर,गोपाल पाटिल,देवीदास राठोड यांची उपस्थीती होती. संघटना सदस्य नरेशजी असावा यांनी आपल्या निवासस्थानी तालुक्यातील पत्रकारांसाठी यावेळी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
……………………………………………
पत्रकार भवनात पत्रकार दिनाचे आयोजन
6 जानेवारीला पत्रकार दिनाचे औचित्य साधून वाशिम येथील पत्रकार भावनात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी केले.
आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार सोहळ्याचे आयोजन माहूरला.
महाराष्ट्र राज्यातील आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघाला दरवर्षी जिल्हा जाणारा आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार पुरस्कार सोहळा 13 जानेवारी ला माहूर येथे आयोजन करण्यात आलेला आहे . याप्रसंगी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख , राज्याध्यक्ष शरद पाबळे किरण नाईक. सह वरिष्ठ मंडळी उपस्थित राहणार आहे तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान अंभोरे यांनी केले.