विमुक्त जातीमधील बोगस घूसखोरी थांबविण्यासाठी ८ डिसेंबरला नागपूर येथील महामोर्चात सहभागी व्हा.
– सुनिल राठोड
गोरसेना तालुकाध्यक्ष मानोरा
विमुक्त जाती मधील सर्वच समाज बांधवांना त्यामध्ये बेरड, बेस्तर,भामटा, वडार, कंजारभाट,कैकाडी, कटगू,बंजारा, राजपारधी, पालपारधी, राजपूत भामटा, रामोशी, वाघरी,छप्परबंद ह्या जातीतील सर्वच समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, गेल्या अनेक वर्षापासून आपल्या विमुक्त जाती (अ) मध्ये मोठ्या प्रमाणात राजपूत,परदेशी, छप्परबंद,मीना, ह्या जातीच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्रे व खोटे जात वैधता प्रमाणपत्र काढून ह्या विमुक्त जाती (अ) मध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलेली आहे. आणि आपल्या हक्कांच आरक्षण त्यांनी घुसखोरी करून हिसकावून घेतलेले आहे. हि घुसखोरी थांबविण्यासाठी गोरबंजारा समाजातील सगळ्याच संघटना आणि इतर विविध संघटनांनी आणि विशेषतः गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात गोरसेनेनी महाराष्ट्र राज्यातील तालुका जिल्यातील ठिकाणी या विरोधात रान उठवले होते. गोरसेनेकडून २०१९ साली रास्ता रोको आंदोलन केल्या गेले.२२ जुलै २०१९ रोजी एकाच दिवशी २५ जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केल्या गेले आणि २०२३ मध्ये पुन्हा २५ जिल्ह्यात एकाच दिवशी रास्ता रोको आंदोलन केल्या गेले. त्याचे परिणाम राजपूत भामटा मधला भामटा हा शब्द आम्ही काढून टाकणार नाही असं विधिमंडळात सरकारला सांगाव लागल. आणि ४ ऑगस्ट २०२३ ला गोरसेनेकडून एकाच दिवशी महाराष्ट्रात २१ जिल्ह्यात ३५ ठिकाणी सरकारच्या विरोधात मुख्यमंत्री यांना जोडेमारो आंदोलन आणि पुतळा दहन करण्यात आले. आणि परत २४ ऑगस्ट २०२४ रोजी गोरसेना सहित समाजातील प्रमुख अनेक संघटनांनी महामोर्चा काढून विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले. तरी या सरकारने कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. किंवा दाद दिली नाही, म्हणून यांना आता धडा शिकविण्यासाठी ८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यशवंत स्टेडियम येथे सकाळी ठीक बरोबर ११ वाजता लाखोच्या संख्येने सहभागी होऊन आपल्या मागण्या या सरकारपर्यंत पोहचवूया आणि झोपलेल्या सरकारला जागे करूया म्हणून विमुक्त जाती मधील सगळ्याच समाज बांधवांनी आपण आपल्या आयुष्यासाठी आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी एक दिवस वेळ देऊन सहभागी व्हावे. जर आपण आता जागे झालो नाही तर येणारा काळ अतिशय बिकट राहील म्हणून सर्वांनी गांभीर्याने या महामोर्चात लाखोच्या संख्येने होऊन सहभागी व्हावे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या –
१) विमुक्त जाती (अ) प्रवर्गात मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने घुसखोरी करून खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थी आणि देणाऱ्या संबंधित अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करून विशेष पथक (SIT) ची नेमणूक करण्यात यावी.
१) महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणी समितीत विमुक्त जाती प्रवर्गातील एक शासकीय प्रतिनिधी नेमण्यात यावे.
३) २०१७ चा रक्त नांते संबंधातील जि.आर त्वरित रद्द करण्यात यावा.
४) प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्यातील खरे राजपूत भामटा यांचे वास्तव्य निवासस्थान कुठे कुठे आहे.त्यांची तालुका जिल्हा निहाय यादी बार्टि मार्फत जाहीर करण्यात यावी.