राज्यस्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार वाशिम शहरात
गृहमंत्र्यांच्या अवर सचिवांच्या प्रयत्नाने वाशिम जिल्ह्याला राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा मान
मानोरा:– आपल्या हक्काचा आणि अधिकाराचा माणूस एखाद्या महत्त्वाच्या पदावर असला तर समस्यांचा निपटारा अगदी त्वरित होतो याची प्रचिती सध्या मानोरा तालुकाच नव्हे तर वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना येत आहे.
मानोरा तालुक्यातील संतांची भूमी असलेल्या कोंडोलीचे भूमिपुत्र अमोल पाटणकर मंत्रालयात अव्वर सचिव या पदावर कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ते जवाबदारी सांभाळतात. लोकांची कामे करणारा अधिकारी म्हणून त्यांची जिल्हाभर ख्याती होत आहे. कुणाचाही चेहरा न बघता केवळ समस्या सोडविण्याला प्राधान्य देणारा अधिकारी म्हणून ते नावारुपाला आले आहेत.
त्यांच्या प्रयत्नाने जिल्हा वाशीयांच्या विविध क्षेत्रातील मोठमोठ्या समस्या मार्गी लागतांना दिसत आहे. राजधानीच्या शहरात कार्यरत असणारे अमोल पाटणकरांचे सदैव लक्ष मात्र आपल्या जिल्हातील आणि सर्वसामान्याच्या प्रश्नांकडे कायम असतं याची प्रचिती नुकतीच आली.
वाशिम जिल्हात आट्यापाट्या या खेळात अनेक उत्तमोत्तम खेळाडू असून अनेकांना राज्याचा सन्मानाचा क्रीडाक्षेत्रातील छत्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. या खेळाच्या माध्यमातून सागर गुल्हाने या खेळाडूने क्रिडा क्षेत्रात एक भरीव काम केले आहे. क्रिडा क्षेत्राशी संबंधित असलेल्या समस्या या खेळाडूंनी अमोल पाटणकर यांच्याकडे मांडल्या तेव्हा त्यांनी विशेष लक्ष घातले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे या क्षेत्राचे आ. लखन मलिक यांनी क्रीडामंत्री यांना केलेल्या विनंतीवरून राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा वाशिम शहरात होणार आहेत. यापूर्वी या स्पर्धेचे आयोजन धाराशिव या जिल्ह्यात होणार होते परंतु ते रद्द करुन आयोजनाच्या यजमान पदाची माळ वाशिम जिल्हाच्या गळ्यात पडली आहे. अशा प्रकारच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा मान प्रथमच आपल्या जिल्ह्यास लाभत असल्याने क्रिडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपला अधिकारी असलेला माणूस अमोल पाटणकर यांच्या या विशेष प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.