श्री घंटीबाबा “पादुका पालखीयात्रेत” असंख्य भक्तांची उपस्थिती
दिग्रस :-
दिग्रसचे ग्रामदैवत श्री घंटीबाबा यांची”पादुका पालखी” काल {ता ३} सायंकाळी काढण्यात आली होती . मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड , माजी मंत्री संजय राठोडसह इतर राजकीय पुढारी , अधिकारी , कर्मचारी , भावीकभक्त बहुसंख्येने उपस्थित होते .
दिग्रस येथे श्री घंटीबाबा यांचा वार्षिक यात्रा महोत्सव अंतिम टप्प्यात असून काल सायंकाळी ५ वाजता मंदिरातून भव्य “पादुका पालखी यात्रा” काढण्यात आली होती . मृद व जलसंधारण तथा पालकमंत्री संजय राठोड , माजी मंत्री संजय देशमुख , माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग , नायबतहसीलदार सुधाकर राठोड , अजिंक्य मात्रे , प्रमोद बनगीनवार , सुभाष कटेकर , बाबूसिंग जाधव , प्रमोद सूर्यवंशी , केतन रत्नपारखी , बाळू इंगळे , संजीव चोपडे , विनायक दुधे , नानासाहेब महिंद्रे , डॉ प्रदीप मेहता , उद्धव अंबुरेसह असंख्य भावीकभक्त, विविध विभागातील कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते .
शहरातील प्रमुख मार्ग व चौकावर व्यापारी बांधव व महिलांनी पालखीचे दर्शन घेत पूजापाठ केली . मिरवणूक यात्रेच्या संपूर्ण मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती . महिलांच्या भजनी मंडळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते .