पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्यांची प्रकृती खालावली
आरक्षणातील बेकायदेशीर घुसखोरांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांच्या समर्थनार्थ आज निर्धार सभा
मानोरा:– तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भटके विमुक्त प्रवर्गातील घटना दत्त आरक्षणामध्ये काही प्रगत जात समूहांद्वारा बेकायदेशीर मार्गाने होत असलेली घुसखोरी व या घुसखोरीची विशेष चौकशी समितीकडून शहानिशा करण्याच्या मुख्य मागणीसाठी मागील चार दिवसांपासून ऊपोशनाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील राजेश राठोड आणि जालना जिल्ह्यातील श्याम राठोड,सचिन राठोड आणि अमोल राठोड हे चार उपोषणार्थी २५ ऑक्टोबर पासून तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भटके विमुक्त प्रवर्गामध्ये समाविष्ट असलेल्या राजपूत भामटा या जातीच्या नाम सदृश्यतेचा फायदा घेऊन राजपूत समाजा द्वारा शेकडो च्या संख्येत बनावट जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र घेऊन मूळ मागासवर्गीय भटके विमुक्त प्रवर्गातील शिक्षण व रोजगाराच्या संधी हिरावून घेऊन अन्याय करीत असल्याच्या व ह्या बेकायदेशीर कृत्याची मागणी करूनही शासनाकडून बनावट कागदपत्रांद्वारे विमुक्त भटक्यांची जात चोरणाऱ्यांचे पाठराखण करण्याच्या विरोधात अन्न व जलत्याग आंदोलन सुरू केलेले आहे.
शासन व प्रशासनाकडे रीतसर पाठपुरावा करूनही मागासवर्गीय जातीच्या आरक्षणावर घाला घालण्याच्या प्रकाराला आळा बसत नसल्याने व बेकायदेशीर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांच्या विरोधात उचित कारवाईच्या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून कोणत्याही प्रकारचे अन्न व पाणी सुद्धा न पिता उपोषण करीत असलेल्या चारही उपोषणकर्त्यांच्या प्रकृती बिघडली असल्याचे येथील बामनलाल महाराज देवस्थानचे विश्वस्त सुनील महाराज यांनी माहिती दिली. उपोषणकर्त्यांपैकीच एक असणारे राजेश राठोड यांना साखर आजाराचा तथा शाम राठोड यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने भटके विमुक्त प्रवर्गामध्ये या उपोषणकर्त्यांच्या प्रकृती विषयी चिंता निर्माण झाली असून उपोषणकर्त्यांच्या व सकल भटके उमुक्त प्रवर्गातील आरक्षणामध्ये होत असलेल्या बेकायदेशीर कृत्यांबाबत शासनाने निर्णय घेण्याची एकमुखी मागणीही या निमित्ताने पुढे येत आहे.
#
मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा येत असल्याच्या निषेधार्थ उपोषण करीत असलेल्या चार समाज बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भटके विमुक्त समाज बांधवांकडून आज पोहरादेवी येथे निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.