अनिश्चिततेने भरलेले मानवी जीवन सदुपयोगासाठी अर्पित करा –हभप श्रीराम महाराज चिखलीकर
संत सेवालाल मित्र मंडळातील तरुणांनी घेतले श्रीराम महाराजांचे आशीर्वाद
मानोरा:- तालुक्यातील चिखली या गावचे निवासी आणि तालुकाच नव्हे तर राज्यामध्ये प्रख्यात असलेले हरिभक्त परायण श्रीराम महाराज राठोड यांचे विजयादशमी निमित्त आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी शेकडो तरुणांनी गर्दी केली होती.
तीर्थक्षेत्र गव्हा येथील भवानी मातेच्या देवस्थानावर दोन तपांपर्यंत ह.भ.प.श्रीराम महाराज चिखलीकर यांनी आपल्या अमृतवाणीतून भागवत कथा वाचन केली होती.
भवानी माता देवस्थानावर सेवा करणारे स्वयंसेवी तरुण श्रीराम महाराजांच्या उद्बोधक भागवत कथेने प्रेरित होऊन महाराजांचे भक्त झालेले आहेत.
मागील पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून श्रीराम महाराज गव्हा येथे भागवत कथन करीत नसून सुद्धा गव्हा ह्या गावातील तरुणांच्या मनात खोल जागा करून ठेवलेल्या आणि गुरुस्थानी असणाऱ्या श्रीराम महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विजया दशमीच्या दिवशी गव्हा येथील ही तरुण मंडळी महाराजांच्या कृपा अशीर्वाद प्राप्तीसाठी नित्यनेमाने त्यांच्या निवासस्थाने येत असतात. यावर्षी सुद्धा संस्थेचे अध्यक्ष व तब्बल 70ते80 च्या संख्येत महाराज राहत असलेल्या दिग्रस येथील निवासस्थानी ह्या तरुणांनी महाराजांच्या आशीर्वाद व दर्शनासाठी रांग लावली होती.
जगात सगळ्यात अनिश्चित जीवन असून कुणाची जीवनरेखा किती आहे याचा अंदाज कोणीच बांधू शकत नसल्याने मानवाला मिळालेल्या जीवन काळाचा उपयोग इतरांच्या उपयोगात येऊन हे जीवन सत्कारणी लावण्याची अभिलाषा मार्गदर्शन घेण्यासाठी आलेल्या नवयुकांकडून महाराजांनी बोलताना यावेळी बाळगली.
#
जीवन हे क्षणभंगुर असून आपण या पृथ्वीवर ईश्वराने पाठविलेली पाहुणे आहोत. आपले जीवन सत्कारणी लावून मानव आणि इतर जीव,जंतू विषयी आदरभाव व भूतदया बाळगण्याची अपेक्षा दर्शनासाठी आलेल्या तरुणांनांकडून श्रीराम महाराजांनी केली.