पंतप्रधान मोदींनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला — ना. फडणवीस
पोहरादेवी येथे ओबीसी जागर यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील समारोप जल्लोषात संपन्न
मानोरा ता.१३ —
ओबिसी समाजाचा उत्थान व विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोगाला घटनात्मक दर्जा देवून सर्वतोपरी विकास करण्याचे कार्य हाती घेतले आहे, त्यामुळे ओबीसीचा विकास आता थांबणार नाही. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात तिर्थक्षेत्र पोहरादेवीचा विकास थांबला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच आमचे सहकारी मंत्री संजय राठोड मार्फत विकासाला गती मिळाली असुन संत डॉ.रामराव बापूंचे स्वप्न आता साकार होणार आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे दि. १३ ऑक्टोंबर रोजी पहिल्या टप्प्यातील ओबीसी जागर यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ओबीसी समाज बांधवाना संबोधित करताना बोलत होते.
यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, केंद्रीय ओबिसी आयोगाचे अध्यक्ष माजी खा. हंसराज अहिर, धर्मगुरु बाबुसिंग महाराज, कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज,यशवंत महाराज, राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे, भाजपा ओबीसी प्रदेश अध्यक्ष संजय गाथे, डॉ.आशिष देशमुख, खा.रामदास तडस,खा. अनिल बोंडे,खा.उमेश जाधव, आ. संजय कुटे,आ.रणधीर सावरकर,आ. राजेंद्र पाटणी,आ. निलय नाईक,आ.सरीता गागरे, आ.श्वेता महाले,आ.आकाश फुंडकर,आ. संदीप धूर्वे, आ. प्रविण पोटे,आ. प्रताप अडसर, आ.हरीश पिंपळे,माजी खा. अनंतराव देशमुख, आ.दादाराव केचे,भाजपा जिल्हाध्यक्ष श्याम बढे , महादेव सुपारे, जिल्हा संघटन मंत्री नागेश धोपे आदीसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुढे ना. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे.ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणत्याही प्रकारची वाटेकरी होऊ दिली जाणार नाही, भटक्या विमुक्त समाजाला आणि त्यातील दुर्लक्षित घटकांना भरघोस निधी देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात त्तरतुद करण्यात येईल, इतर मागास समाजाचे महामंडळ सारथी, बारटी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांच्या वाटपात सुसूत्रता आणून सर्व समाज घटकांना समान न्याय देण्याचे काम सरकार करत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपयांची योजना सरकारने तयार केली असुन केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेशी सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदाराना लाभ मिळवून दिला जाईल. यासह राज्य व केंद्र सरकारच्या योजनेचा ऊहापोह केला. यावेळी मतदार संघाचे आ. राजेंद्र पाटणी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, पिवळा मोझक या रोगाच्या प्रादुर्भावाने वाशीम जिल्हयात सोयाबीन या पिकांचा उतारा घटला आहे. तसेच राज्यातील आकांक्षित अती मागासलेल्या मानोरा तालुक्यातील तांडा वस्तीत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. असता येत्या कॅबिनेट मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रश्न मार्गी लावू व वाडी तांडा वस्तीचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन उपमुख्यंत्री ना.फडणविस यांनी याप्रसंगी दिले.