शासकीय वसतीगृह व्यावसायीक अभ्यासक्रम प्रवेश३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
वाशिम,दि.10 (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती व इतर मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांकरीता वसतिगृह ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्यातील वाशिम,मंगरुळपीर, कारंजा व सवड येथे मुलांचे आणि वाशिम व मंगरुळपीर येथे मुलींचे असे एकुण ६ शासकीय वसतीगृहे आहेत.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता ऑफलाईन पध्दतीने प्रवेश देण्याबाबतची प्रक्रीया सुरु झाली आहे.मुलामुलींच्या व्यावसायीक अभ्यासक्रमाचे वसतीगृह प्रवेशाचे परिपत्रक प्राप्त झाले आहे.या परिपत्रकानुसार शासकीय वसतीगृह प्रवेशाकरीता व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत २० सप्टेंबर २०२३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.
२० सप्टेंबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार मुंबईत शिक्षण घेणाऱ्या गरजू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे हे एकमेव पर्याय आहे तसेच महा सीईटीचे काही अभ्यासक्रमाचे ४ थी फेरी सध्या समाप्त झालेली नाही व अनेक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात प्रवेश झाले नसल्याने याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहे.
महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल,महाराष्ट्र राज्य,मंबई यांच्या २४ ऑगस्टच्या नोटीसनुसार व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रीयाची मुदत ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत देण्यात आली आहे. या अनुषंगाने व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशाची मुदत आयुक्तालयाच्या ६ ऑक्टोबर २०२३ नुसार दिलेल्या वेळापत्रकात नमुद केल्याप्रमाणे वाढविण्यात आली आहे.
वसतीगृहस्तरावर प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध असुन प्रवेश अर्ज वाटप सुरु आहे.याबाबत गरजू व इच्छूक विदयार्थ्यांनी लाभ घ्यावा.असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.
*