डॉ.आंबेडकर भवनात धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन
◆दिग्रसच्या धम्म उपासकांनी लाभ घेण्याचे आवाहन
दिग्रस :
येथील पडगिलवार ले-आऊट मधील सम्राट अशोक बुध्द विहार, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात भिख्खूच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दि.८ सप्टेंबर रोजी धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धम्मदेसना कार्यक्रमाला पुज्य भिक्खु प्रा.डॉ.खेमधम्मो महाथेरो, मुळावा, पुज्य भिक्खु करुणानंद थेरो, पुज्य भिक्खु धम्मबोधी थेरो, पुज्य भिक्खु एन.धम्मानंद थेरो, औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शुक्रवारी दि.८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सम्राट अशोक बुध्द विहार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात धम्मदेसना कार्यक्रमाला सुरुवात होईल. यावेळी भगवान गौतम बुद्धांनी जगाला दिलेला संदेश व त्यांचे विचार याबाबत मार्गदर्शन देखील उपस्थित भिख्खू करणार आहेत. या कार्यक्रमाला दिग्रस मधील सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांनी उपस्थित राहुन धम्मदेसनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन मोहाडे परिवारा तर्फे करण्यात येत आहे.