स्पर्धा परिक्षेवरील परीक्षा शुल्क कमी करा
◆दिग्रसच्या बेरोजगार युवकांचे मंत्री संजय राठोड यांना निवेदन
दिग्रस :
शासनाकडून विविध विभागांतील रिक्त जागांसाठी भर्ती घेण्यात येत असून यासाठी १००० रुपयांच्या जवळपास परीक्षा शुल्क आकारले जात आहे. राज्यात सध्या परिस्थितीत युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना एवढे परीक्षा शुल्क भरणे कठीण झाले आहे, त्यामुळे या परीक्षांवरील शुल्क कमी करून शासनाच्या परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात अशी मागणी करणारे निवेदन मंत्री संजय राठोड यांना दिग्रसच्या युवकांनी दिले.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यामधील रिक्त असलेल्या जागाच्या जाहीराती निघत आहेत. या सर्व परीक्षा आय.बी.पी.एस. व टी.सी.एस. या कंपण्यांमार्फत घेण्यात येत आहेत, परंतु या परिक्षेच्या वेळी कुठल्यातरी प्रकाराचा गोधळ निर्माण होतो. उदा. पेपर फुटतो, नविन तंत्रज्ञानाने कॉपी केल्या जाते असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडुन आलेत. महाराष्ट्र राज्यात सध्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सुशीक्षित बेरोजगार आहेत. त्यामुळे या युवकांना नोकरीची नितांत आवश्यकता आहे. राज्यातील बहुतांश युवकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे परीक्षेची १००० रु फी सुध्दा भरणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे शासनाने ही परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेऊन यावरील परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी दिग्रसच्या युवकांनी यावेळी मंत्री संजय राठोड यांचेकडे निवेदनातुन केली. निवेदन देतेवेळी सुमित अस्वार, जीवन करोडदेव, शुभम पवार, महेश भोयर, त्रंबकेश्वर राठोड, प्रतीक खोडके, रोशन अवगन, गौरव दुधे यांच्यासह अनेक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी उपस्थित होते.