दिग्रसला प्रलयकारी महापुराचा तडाखा
१८ वर्षानंतर पुन्हा अनेकांचे संसार आले उघड्यावर
दिग्रस :
सन २००५ मध्ये नांदगव्हान धरण फुटून प्रलयकारी महापुराने वित्तहानी सह जीवितहानी सुद्धा केली होती. यामध्ये अनेकांची घरे वाहून जाऊन १४ जणांचा पुरात वाहून बळी गेला होता. या महापुराच्या १८ वर्षा नंतर रविवारी (ता.२२ जुलै) सकाळी आलेल्या प्रलयकारी महापुरात सुदैवाने कोणतीच मानवी जीवितहानी झाली नसून जनावरांचे नक्कीच या पुरात वाहून जाऊन बळी गेल्याचे कळते.
शनिवारी (ता.२२ जुलै) सकाळ पर्यंत ९३ मिमी पाऊसाची शासन दप्तरी नोंद झाली होती. ता. १ जून ते ता.२२ जुलै सकाळी ८ पर्यंत ४४३ मिमी नोंद होती. त्यानंतर संततधार पावसाची हजेरी सुरूच होती. या पावसाची नोंद १५५ मिमी असून एकूण ५९८ पर्जन्यमान पाऊस बरसला. बरसलेल्या पावसामुळे धावंडा व मोरणा या दोन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण करून धोकाची पातळी उलांडून शहरातील आर्णी नाका,समशान भूमी, मालिकार्जुन पुलावर पाणी ओसुंडून वाहत होते. त्यामुळे गावचे दोन भाग होऊन शहरात दोन्ही बाजूस पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरातील अन्न-धान्य, विद्युत उपकरणे, खाण्याचे साहित्य सह घरे वाहून गेल्याने होत्याचे नव्हते होऊन संसार उघड्यावर आले. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थानांतरण शहरातील योगाभवन, मल्लीकार्जुन मंदिर, राष्ट्रीय विद्यालय तसेच नगर परिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक मंडळीने त्यांच्या जेवणाची सोय केली होती. पूर परिस्थिती आटोक्यात आली त्यानंतर रस्त्यावर चिखल, विद्युत डीपी, विद्युत तारा, संसार उपयोगी साहित्य, विद्युत उपकरणे वाहून गेले तर अनेकांच्या घराच्या भिंती पडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रविवारी (ता.२३ जुलै) शहराची पाहणी केली तेव्हा आर्णी बायपास पुलाच्या कड्या खचल्या असून रस्ते उखडून पडले. टिनपत्रे वाहून गेली तर अनेक टिन पत्रे तुटून गेल्याने घराची राखरांगोळी झाली. घराचे हजारो संख्येने नुकसान झाल्याने त्यांच्या मूलभूत सुविधाचा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला आहे. मोतीनगर, गंगानगर, विठ्ठल नगर, शंकर नगर,हिंद नगर, मालिकार्जुन नगर, मानोरा चौक,छत्रपती शिवाजी चौक ,शास्त्रीनगर, व्होलटेकपुरा, पोळा मैदान, शंकर टॉकीज भाग, चमनपुरा सह ग्रामीण भागातील अनेक गावातील घरे या पाण्याच्या विळख्यात आली. पूरपरिस्थिती आटोक्यात आली तेव्हा पूरग्रस्त नागरिकांनी घरातील महत्वाचे कागदपत्रे, दस्तावेज, संसार उपयोगी भांडी - कुंडी अस्तव्यस्त व वाहून गेल्याचे पाहून भयावह झाले होते. पूरपरिस्थिती आटोक्यात येताच नगर परिषदेतर्फे अग्निशमन दलातर्फे रस्त्यावरील चिखल जेसीबीच्या साहाय्याने उपसणे व धुणे करणे सुरू होते. बाजार यार्ड मधील पाण्याने सडलेले धान्य उचलून आरोग्याचा प्रश्न उदभवणार नाही याची दक्षता घेणे सुरू होते. नदी, नाल्या जवळील विद्युत डीपी, विद्युत खांब, तारा तुटून संभाजीनगर, शनिमंदिर परिसर, देवनगर , इसापूर येथील वीज पुरवठा खंडित होता. यामध्ये २ ट्रान्सफर, ३० पोल वाकल्या गेले त्याची दुरुस्ती करणे युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच विद्युत पुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे शहर अभियंता रितेश बोबडे यांनी दिली.
पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख प्रणित मोरे यांच्याकडून (ता. २२ जुलै) अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. यावेळी मनीषा पठाले यांनी पूरग्रस्त नागरिकांची पाहणी करतांना जेवण देण्यासाठी सहकार्य केले. तसेच काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, दिनेश सुकोडे, शंकर जाधव, राजेंद्रसिंह चौहान, सोहेल शेख, म.नागपुरे, पंजाब जाधव, जमीर , मोनू मक्तेदार, फैसल पटेल, संजय महल्ले, गौतम गवळे सह आदींनी ट्रॅक्टरद्वारे अन्नछत्र पूरग्रस्त भागात पाहणी करून देण्यात आले. उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते तथा माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वात देवनगर परिसरात अन्नछत्राचे सुरू करण्यात आले होते. यामध्ये राहुल देशपांडे,अजिंक्य मात्रे, केतन रत्नपारखी, राहुल धुळधुले, प्रज्योत अरगडे, रोशन शेख, इम्रान खान, लोकेश शुक्ला सह आदींनी मदत केली.
या पुरामध्ये घरे वाहून गेलेल्या नागरिकांच्या घराची पाहणी करतांना नागरिकांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. क्षणात होत्याच नव्हते झाल्याच्या वेदना चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होत्या. दिग्रस नदी , नाल्या काठावरील भाग खंडर झाल्याचे दृश्य वेदना देत होत्या. पुराचे पाणी नदी नाल्या काठावरील शेतीत घुसल्याने शेतकऱ्याच्या शेतीत पाणी तलावच झाल्याचे दृश्य सर्वत्र दिसत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रलयकारी महापुरामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला होता. पूरपरिस्थिती वेळी तहसीलदार अक्षय रासणे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी रमेश खरोडे, तालुका कृषी अधिकारी एस.एस.राजपूत महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभाग परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. कुठलीही हानी होणार नाही याची दक्षता सुद्धा घेण्यात आली. दिग्रस मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी चौक सह इतर ठिकाणच्या ग्राऊंड फ्लोयरच्या दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून आर्थिक नुकसान झाले असून ग्राऊंड फ्लोयरच्या दुकानातून मोटार पंपाने पाणी काढणे सुरू होते. मानोरा चौकातील नाल्याला भयंकर पूर आल्याने बाजूला असलेल्या चाणक्य लॉन शाळेची भिंत कोसळली व मानोरा चौकातील परिसरात पाणी घरासह रस्त्यावर आल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले होते. रविवारी (ता.२३) महसूल प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त भागातील घराची पाहणी करून पंचनामा करणे सुरू केला आहे. घराच्या नुकसानीची व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी असा टाहो पुरगस्तांनी फोडला आहे.