महिलांच्या अब्रूशी खेळणाऱ्यांना फासावर लटकवा
मणिपूर मधील घटनेच्या निषेधासाठी सामाजिक संघटनांचा तहसील कचेरी वर मोर्चा
मानोरा —
मणिपूर राज्यात आदिवासी महिलेवर अत्याचार करून खून करणाऱ्याला नराधमांना फासी व्हावी, मणिपूर सरकार बरखास्त करावे, पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावे. या मागणीसाठी आदिवासी समाजातील विविध संघटना व समाज क्रांती आघाडी मार्फत २६ फेब्रुवारी ला तहसील कचेरी वर मोर्चा धडकला.
मणिपूर येथील आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवा, मणिपूर सरकार बरखास्त करा, पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावे या मागणी करिता राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व समाज क्रांती आघाडी मार्फत बुधवारला मानोरा पंचायत समिती वरून मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिग्रस चौक मार्गे तहसील कचेवर धडकला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी प्रा.जय चव्हाण,बळीभाऊ राठोड, संतोष जाधव, गजानन राठोड, गजानन अहमदाबादकर, राजेश मस्के, डॉ अशोक करसडे, गजानन पवार, हंसराज शेंडे आदिनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक जय चव्हाण संचालन गोपाल शर्मा तर आभार गोलू वायले यांनी मानले. या नंतर तहसीलदार राजेश वजीरे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात महिला व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बळीभाऊ राठोड मोर्चेकरींना संबोधित करताना