पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याची कमिटी तयार करणार
#उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
वाशिम/मानोरा
पोहरादेवी विकास आराखड्यात पोहरादेवी ग्रामपंचायतचा कृती आराखडा समावेश करून पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कृती समिती तयार करू, त्यात पालकमंत्री, आमदार, खासदार, माजी मंत्री व अनेक प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश केला जाईल अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गुरुवारी दिनांक २९/०६/२०२३ रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आमदार गोपिचंदजी पडळकर, माजी आमदार अनंतकुमारजी पाटील, भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष विजय अनंतकुमार पाटील या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी ग्रामपंचायत पोहरादेवी ता. मानोरा जि. वाशिम यांचा कृती आराखडा उपमुख्यमंत्री यांना देण्यात आला व या कृती आराखड्याचा तिर्थक्षेत्र विकास आराखड्या मध्ये समावेश करण्याची मागणी केली असता त्यांनी कृती आराखड्यास मान्यता देत पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याची कमिटी तयार करण्याची ग्वाही दिली.
त्या कमिटी मध्ये वाशिम जिल्हा पालकमंत्री ना. संजय राठोड , कारंजा मानोर मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी व ग्रामपंचायत पोहरादेवी सरपंच विनोद चंदुसिंग राठोड तसेच माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महिला सदस्य व गावातील काही प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
पोहरादेवी ग्रामपंचायत आराखड्यामधील कामे खालील स्वरूपात आहेत —
१) राज्य महामार्ग पोहरादेवी ते सिंगद
२) केंद्रीय महामार्ग पोहरादेवी ते वाईगौळ सिमेंट काँक्रेट रस्ता व दुतर्फा नाली व रुंदीकरण व सर्व पुलासह,
पोहरादेवी ते पंचांळा फाटा सिमेंट काँक्रेट रस्ता व दुतर्फा नाली व रुंदीकरण व सर्व पुलासह.
३) हनुमान मंदिरवर भव्य सभामंडप.
४)जुनी ग्रामपंचायत भवन पाडुन नविन इमारत बांधुन त्यामध्ये खाली शॉपिंग कॉम्प्लेक्स वर ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय.
५) उपजिल्हा रुग्णालय त्या मध्ये ३५ खाटांची प्रशस्त इमारत. इसिजी सुविधा एक्स-रे मशीन ऑक्सीजन मशीन व रक्त निदान उपकरणे इत्यादी.
६) स्वतंत्र गावठाण फिडर.
७) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तिर्थक्षेत्र पर्यटन पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकभक्तांना एस.टी. महामंडळामार्फत विदर्भाकडे ये-जा करणाऱ्या सर्व बस फेऱ्या तिर्थक्षेत्र पोहरादेवी मार्फत करणेबाबत.
,पोहरादेवी येथे येणाऱ्या एस.टी. चालक व वाहक यांना रेस्ट रूम, पाणी व्यवस्था, बसस्थानकाला वाहक निरीक्षक देणेबाबत.
८) शासकीय विश्रामगृह
९) पोलिस स्टेशन
१०)शाळा डिजिटल करणेबाबत
११) पोहरादेवी परिसरात विद्युत रोशनी.
१२) पोहरादेवी येथे रेल्वे महामार्ग करणेबाबत.
१३) केंद्रीय दुरसंचार विभागाचे मोठे कार्यालय व मोठे टाॅवर करणेबाबत.
१४) राष्ट्रीयकृत बँकेची शाखा मिळणेबाबत.
१५)डाक विभागाचे कार्यालय इमारत मिळण्याबाबत .
१६)जल व्यवस्थापन.
१७)घन कचरा व्यवस्थापन.
१८) क्रिडा संकुल
१९) महिला भवन
व गावातील अनेक रस्ते नाल्या व सौंदर्यकरण करण्याबाबतच्या कामांचा या आराखड्या मध्ये समावेश आहे.