तुपटाकळी येथे आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराजांचे हरिकीर्तन
■श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदिरातर्फे आयोजन
दिग्रस :
‘आई माझी मायेचा सागर’ फेम ‘अनमोल जन्म दिला गं आई तुझे उपकार फिटणार नाही’ या अशा आपल्या कीर्तनातून प्रबोधन करणाऱ्या व आवाजाचे जादूगर ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांचे आज बुधवार दि. २९ मार्च रोजी २०२३ सायंकाळी ८ वाजता तुपटाकळी येथे हरिकीर्तन होणार असून श्रीरामनवमी निमित्त श्रीराम मंदिर संस्थान तुपटाकळी हे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील तुपटाकळी येथे भव्य व पुरातन श्रीराम मंदिर असून गेल्या १५० पेक्षा अधिक वर्षांपासून येथे श्रीरामजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा देखील श्रीरामजन्मोत्सवानिमित्त प्रसिध्द कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज यांचे मधुर वाणीतून हरीकीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून या हरिकीर्तनाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान तुपटाकळीच्या वतीने करण्यात आला आहे.
Yavatmal Edition