निकी जाधव कडून गोर बंजारा संस्कृतिची जपवणूक
पुणे :
वैभवशाली संस्कृतीचा वरासदार असणारा गोर बंजारा समाज, आपली वेगळी बोलीभाषा, वेशभुषा, खाद्य संस्कृति, संपूर्ण जगाला परिचित आहे.
कॉलेज मधील फ्रेशर पार्टी मध्ये निकी किसन जाधव हिने आपली संस्कृति जतन व्हावी या उद्देशाने आपला पोशाख परिधान करुन संपूर्ण बंजारा समाजाच्या मुलींना संस्कृती जतन करण्याचा संदेश दिला आहे.
संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने निकी जाधव हीचे कौतुक करण्यात येत आहे व सोशल मीडियावर संपूर्ण बंजारा समाजातर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.