छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोटारसायकल रॅलीसह दुपारी छत्रपतींच्या मुर्तीच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन
◆दिग्रसच्या श्रीशिवछत्रपती संघटनेकडून तिथीनुसार शिवजयंती उत्सव
दिग्रस :
येथील श्रीशिवछत्रपती संघटनेच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुक्रवारी दि.१० मार्च रोजी सकाळी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्रीशिवछत्रपती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या ४० वर्षांपूर्वी दिग्रस येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. जेव्हापासून श्रीशिवछत्रपती संघटनेने ही जयंती साजरी करण्यास सुरुवात केली, त्यावेळी प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीची दरवर्षी शहरातून शोभायात्रा काढण्यात येते. यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दि.१० मार्च रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून या शोभायात्रेत विविध शिवकालीन झाक्या सहभागी होणार असून या शोभायात्रेत शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन श्रीशिवछत्रपती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. ही शोभायात्रा शहरातील वडवाला जिनिंग येथून सुरू होणार असून शहरातील प्रमुख मार्गाने निघणार आहे.