शिवजयंती निमित्त अभिवादन रॅली
◆लेझीमच्या सादरीकरणासह ढेमसा नृत्याने वेधले दिग्रसकरांचे लक्ष
दिग्रस :
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने भव्य अभिवादन रॅली काढण्यात आली होती. या अभिवादन रॅलीत शहरातील विविध शाळेतील झाक्या सहभागी झाल्या होत्या.
या अभिवादन रॅलीत दिग्रसच्या विद्यानिकेतन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या सादरीकरणाने तसेच या आदिवासी ढेमसा नृत्याने दिग्रसकरांचे लक्ष वेधून घेतले होते. लेझीमच्या सादरीकरणादरम्यान जिजामाता व शिवबाच्या वेशभूषेतील चिमुल्यांनी शिवकालीन देखावा सादर केला. हा देखावा या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.