दिग्रसमध्ये बाईकरॅलीत भगवे वादळ
◆शिवजयंती निमित्त निघाली होती बाईकरॅली
दिग्रस :
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती दिग्रसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य दुचाकीरॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या अग्रस्थानी महिला, युवती व नंतर युवक अशी बाईकरॅली शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करित छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त झाली. बाईकरॅली दरम्यान शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण दिग्रस शहर दुमदुमुन गेले होते.
बाईक रॅलीत सहभागी सर्वांनीच आपल्या वाहनावर भगवे ध्वज लावल्याने भगवे वादळ आल्याचा भास होत होता. या भगव्या बाईकरॅलीने दिग्रसकरांचे लक्ष वेधून घेतले होते.