शाळा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर
◆वादग्रस्त मुख्याध्यापक आणि इतरांना शिक्षण विभाग पाठीशी घालत असल्याची तक्रार
वाशिम / मानोरा :
मानोरा तालुक्यातील वसंतराव नाईक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत चव्हाण यांच्या वादग्रस्त आणि कार्यकक्षे बाहेर जाऊन करण्यात आलेल्या कामांना जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय पाठबळ देत असल्याची तक्रार उपसंचालक कार्यालय अमरावती येथे करण्यात आली आहे.
पाळोदी येथील वसंतराव नाईक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत चव्हाण आणि शिपाई रवी हेमंत चव्हाण त्यांच्यावर विविध कलमान्वये आसेगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले असून उपरोक्त मुख्यध्यापक, चपराशी आणि भारत चंदू चव्हाण व ईतरांना हाताशी धरून आसेगाव पोलीस स्टेशन द्वारा मागितलेली माहितीसाठी चे आवश्यक असलेले शाळेतील कागदपत्रांची कपाट फोडून गावातील विद्यार्थी, पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागाला दुसऱ्या ठिकाणी शाळा इमारत दाखवून दिशाभूल करीत असल्याची तक्रार शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे प्रवीण भोपासिंग चव्हाण यांनी केली आहे.
मुख्याध्यापक वसंत चव्हाण यांनी अधिकार नसताना बनावट कागदपत्रे तयार करून भारत चंदू चव्हाण यांना सहाय्य केल्याप्रकरणीचे कागदपत्रे पोलीस स्टेशन आसेगाव यांनी पोलीस स्टेशन कार्यालयात घेऊन येण्यासंदर्भात मुख्याध्यापक चव्हाण भारत चंदू चव्हाण आणि इतरांना नोटीस बजावली असतानाच्या दरम्यान मुख्याध्यापक चव्हाण यांनी भारत चंदू चव्हाण यांना मदत करण्याच्या हेतूने शाळेतील सगळ्या कागदपत्रांची चोरी केली.
वसंत चव्हाण यांना संस्था पदाधिकाऱ्यांनी दोन महिने पूर्वी निलंबित केलेले असून वसंत चव्हाण, रवी चव्हाण आणि देवीचंद लोकचंद राठोड ही कर्मचारी मागील दोन महिन्यापासून शाळेत सतत गैरहजर असूनही त्यांच्या मासिक वेतनाची बिले जिल्हा शिक्षण विभागाकडून स्वीकारल्या जात असून उपरोक्त वादग्रस्त आणि निलंबित कर्मचाऱ्यांना अभय देण्याचे काम शिक्षण विभाग करीत असल्याचे शिक्षण उपसंचालक अमरावती यांना दिलेल्या निवेदनात आरोप करण्यात आले आहे. या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील संस्था पदाधिकाऱ्यांच्या आपसी वादात शैक्षणिक आणि शाळेचे प्रशासकीय कामे सोडून मुख्याध्यापक रस घेत असल्याने मुख्याध्यापक आणि शाळेतील कर्मचारी व संस्थेत दोन गट अशा तिहेरी कात्रीत या शाळेत ज्ञानार्जन करीत असलेले विद्यार्थी अडकलेले आहेत.